पाकिस्तानी प्रेमीका ला भेटण्या साठी निघालेला तरुण कुटूंबीयांच्या स्वाधीन.”प्रेमासाठी देशाची सिमा ओलांडण्या साठी निघाला होता
पुज्य नगरी न्यूज (उस्मानाबाद दि २९ ) फेसबुक वरून प्रेम झालेल्या पाकिस्तानी प्रेमीकेला भेटण्या साठी निघालेल्या प्रेमीचा प्रेमाचा प्रवास अर्धवट राहिला असुन उस्मानाबाद येथिल पोलिसांनी त्या तरुणाला दि २९ रोजी त्याच्या कुटूंबाच्या स्वाधीन केले आहे , जिशान सलीम सिद्दीकी, वय 20 वर्षे, रा., उस्मानाबाद हा दि. 11. जुलै रोजी सकाळी 09.00 वा. सुमारास मोबाईल फोन दुरुस्तीचा बहाना करुन घराबाहेर पडला परंतु घरी परतला नाही. यावर त्याच्या कुटूंबीयांनी सायंकाळीच पो.ठा. शहर गाठून बेपत्ता क्र. 16 /2020 नोंदवली. ही हकीकत मा. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना समजताच त्यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पो.ठा. यांना संबंधीत तरुणाचा शोध घेण्यास सांगीतले. यावर पोलीस पथकाने जिशानच्या सोशल मिडीया अकाऊंटची सखोल माहिती घेतली असता त्या तरुणाचे तथाकथीत पाकिस्तानी तरुणीशी प्रेमसंबंधाने चॅटींग सुरु असल्याचे व भेटीसाठी ती तरुणी त्याला पाकिस्तानात बोलवत असल्याचे निदर्शनास आले. उस्मानाबाद पोलीसांच्या सायबर पो.ठा. ने आधुनिक तंत्रज्ञानाने जिश...