Posts

पुज्य नगरी न्यूज

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद

Image
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद; तहसीलदारांना निवेदन देत सरकारचे वेधले लक्ष पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज | परंडा, दि. २० मे ऑनलाईन औषध विक्री, बनावट औषधांचा वाढता धोका आणि मेडिकल व्यवसायासमोरील गंभीर समस्यांविरोधात परंडा शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी एकदिवसीय बंद पाळत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने या आंदोलनाची तीव्रता दिसून आली. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (MSCDA) यांच्या आवाहनानुसार हा बंद पाळण्यात आला. यावेळी परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधले. औषध विक्रेत्यांनी आरोप केला की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून अनियंत्रित ‘डीप डिस्काउंट’ पद्धतीमुळे स्थानिक व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच बनावट व संशयास्पद औषधांच्या विक्रीत वाढ होत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निवेदनात ई-फार्मसी सं...

सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवीन नियुक्त्या जाहीरपरंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड

Image
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवीन नियुक्त्या जाहीर परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड  पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  परंडा ( दि १४ मे )  सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे यांच्या आदेशानुसार व धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची तर  तुळजापूर तालुका अध्यक्षपदी मंगेश हरि दीक्षित, वाशी तालुका अध्यक्षपदी दादासाहेब प्रभाकर वेदपाठक, धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण मधुकर जेरे यांची निवड करण्यात आली आहे , नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे सुवर्णकार समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल, तसेच संघटना अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी व्यक्त केला.  यावेळी सराफ सरंक्षण समीती चे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते , नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्य...

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १०० %

Image
* पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  आकुर्डी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवत विद्यालयाच्या व संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता दहावीचे एकूण ६६ विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व ६६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये २९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ३४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. तसेच ३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये व...

बालीकेवर अत्याचार करणाऱ्या अरोपीला फाशी देण्याची मागणी

Image
नसरापूर अत्याचार प्रकरण पेटलं! आरोपीला फाशीची मागणी  वकिलांनी केस न घेण्याचं आवाहन पुणे (प्रतिनिधी शंकर जोग )    भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम भुजबळ यांना निवेदन देत, “आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलांनी स्वीकारू नये” असे आवाहन करण्यात आले. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप असून, आरोपीला लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.  या निवेदनावेळी शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे शहर प्रमुख रोहित उर्फ बापू कसबेकर, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी, उपशहर प्रमुख सुनील जाधव, संजय डोंगरे, शहर संघटक अनिल बटाने, निलेश जगताप, मागासवर्गीय शहर प्रमुख महेंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने...

परंड्यात नव्या सीए कार्यालयाचा शुभारंभ

Image
परंड्यात नव्या सीए कार्यालयाचा शुभारंभ; तरुण व्यावसायिकाला मोठा प्रतिसाद पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  परांडा :( )  शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक नवे पाऊल पडत, चार्टर्ड अकाउंटंट आवेज शेख यांच्या कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. परंडा तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांचे सुपुत्र असलेल्या आवेज शेख यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात परंडा शहरातून केली आहे. या नव्या सीए कार्यालयाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी अरुण देबडवारकर, परंडा शहराचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर तसेच सुप्रसिद्ध अडत व्यापारी बाबा बहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला परंडा शहरातील व्यापारी, नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आवेज शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, आवेज शेख हे परंडा नगर परिषदेचे नगरसेवक वाजीद दखनी यांचे भाचे असून, त्यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे...

कैवल्य रमेश वैद्य गुरुजी यांना “डॉ.” पदवी प्रदान

Image
 परंडा येथील कैवल्य रमेश वैद्य गुरुजी यांना “डॉ.” पदवी प्रदान पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  नवी दिल्ली (प्रतिनिधी): पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ, वृंदावन धाम (मथुरा, उ.प्र.) यांच्या तर्फे आयोजित “राष्ट्रीय हिन्दी संगोष्ठी एवं सम्मान समारोह” या कार्यक्रमात आज परंडा येथिल कैवल्य वैद्य गुरुजी यांना “डॉ.” (Doctorate – विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत होटल रेडिसन ब्लू, पश्चिम विहार, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. सुधीर कुमार आर्य (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली), अध्यक्षस्थानी मा. डॉ. इंदु भूषण मिश्रा (कुलपती, पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ) तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. रेखा चौहान (शिक्षण संचालनालय, नवी दिल्ली) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विद्वान उपस्थित होते. कैवल्य वैद्य गुरुजी हे गेल्या चार पिढ्यांपासून चालत आलेल्या पौर...

मायेचा एक घास: जवानांसाठी शुभेच्छापत्र स्पर्धेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी शाळेचा गौरव, 84 विद्यार्थ्यांचा सहभाग

Image
* मायेचा एक घास: जवानांसाठी शुभेच्छापत्र स्पर्धेत पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी शाळेचा गौरव,  84 विद्यार्थ्यांचा सहभाग पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज आकुर्डी  आधार सोशल ट्रस्टने आयोजित केलेल्या “मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हा कार्यक्रम १८ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला. या स्पर्धेत शाळेतील ८४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा विशेष गौरव करण्यात आला. इयत्ता सातवीतील विद्यार्थी यशराज शरद पोटले याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कार्यक्रमास बीएसएफ असिस्टंट कमांडंट प्रतिक वशिष्ठ, राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजी खाडेकर व नगरसेविका जयश्रीताई भूमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या उपक्रमासाठी शाळेच्या कला शिक्षिका विद्या गजरे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभा...