Posts

Showing posts with the label संपादक _ निसार मुजावर

स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीचे निराकरण करण्या साठी भरारी पथकाची नियुक्ती

 सा.पुज्य नगरी  उस्मानाबाद, (दि. २९ )  कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थितीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु आहे. तो चालू राहणे गरजेचे आहे. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे . या संदर्भात नागरिकांकडून धान्य कमी मिळणे, पावती न मिळणे, अन्नापासून वंचित ठेवले जात आहेत. अशा तक्रारी महाफूड पोर्टल, आपले सरकार पोर्टल, जिल्ह्याची व्हॉटसॲप तक्रार निवारण प्रणाली स्तरावर प्राप्त होत आहेत. तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जिल्हास्तर, तालुकास्तर भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्या अधिनस्त कर्मचारी यांची पथकामध्ये नियुक्ती करावी. जिल्हा स्तरावरील भरारी पथकातील अधिकाऱ्यांची नावे, पदनाम आणि मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.    संतोष पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मोबाईल-8805133056, सचिन काळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, मोबाईल-9960188552 यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुका स्तरावरील भरारी पथकातील अधिकाऱ्यांची नावे, ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील दस्तनोंदणी कार्यालये 20 एप्रिल पासून सुरु करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी

  सा . पुज्य नगरी Live news (उस्मानाबाद, दि.20)  :-   महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविला आहे . भारत सरकारने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 3 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचे कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. 3 मे, 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित केले होते.   कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी   दि. 14 एप्रिल, 2020 रोमी उपमुख्यमंत्री   महोदयांच्या अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत सूचित केल्यानुसार सह जिल्हा निबंधक वर्ग 1 (नि.श्रे.) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, उस्मानाबाद   यांनी   जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये ...