Posts

Showing posts with the label सपांदक Nisar mujawar 9423343108

महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

Image
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास महिलांनी पुढाकार घ्यावा    पुज्य नगरी उस्मानाबाद, दि.23 जुन  - शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासोबतच महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंबाला आधार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.   उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी /वाणेवाडी येथील शेतकरी लामतुरे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या शेती शाळेस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन तेथील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.       यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मंगरूळकर, कृषी उपसंचालक काशीद,  कृषी विकास अधिकारी चिमणशेटे, उपविभागीय कृषी अधिकारी कोळेकर, सुमित सोनटक्के , तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व  हिंगळजवाडी /वाणेवाडीचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...