महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे



शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास महिलांनी पुढाकार घ्यावा
  
पुज्य नगरी उस्मानाबाद, दि.23 जुन 

- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासोबतच महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंबाला आधार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

  उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी /वाणेवाडी येथील शेतकरी लामतुरे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या शेती शाळेस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन तेथील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
      यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मंगरूळकर, कृषी उपसंचालक काशीद,  कृषी विकास अधिकारी चिमणशेटे, उपविभागीय कृषी अधिकारी कोळेकर, सुमित सोनटक्के , तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व  हिंगळजवाडी /वाणेवाडीचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
     जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी  शेतकऱ्यांनी पेरणीकरण्यापुर्वी  कृषि विभागाने केलेल्या आव्हानानुसार  बियाण्याची उगवण क्षमता तपासुन व योग्य ती बिजप्रकीया करुनच पेरणी 

करावी असे आवाहन  केले. तसेच  शेतकरी महिलांना फळबाग लागवड व शेतीमध्ये  आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेती करणेकरीता मार्गदर्शन केले.  
     जिल्ह्यातील महिलांनी  शेती पूरक व्यवसाय करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे  व आपल्या कुटुंबाला आधार द्यावा असे आवाहन श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.  भेटीदरम्यान बी.बी.एफ. यंत्राव्दारे पेरणीचे प्रात्यक्षिक ही  घेण्यात आले. 
     
शेतीशाळे दरम्यान .चिमणशेटे यांनी  किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत उपस्थित महिला शेतकरी यांना मार्गदर्शन केले. मंगरुळकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतीशाळा संकल्पने बाबत मार्गदर्शन करुन येत्या खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या शेतीशाळा नियोजना बाबत माहिती दिली .
शेती शाळेमध्ये निंबोळी अर्क तयार करणे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न