Posts

Showing posts with the label Nisar mujawar

परंडा तालुका रेड झोण च्या मार्गावर दि ४ जुलै रोजी कोरोनाचे चार positive रुग्ण आढळले अवारपिंपरी गाव सिल ,

Image
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि ४ ) परंडा शहरासह तालूक्यातील अवारपिंपरी येथिल एका व्यक्तीचा रिपोर्ट दि ४ जुलै रोजी  कोरोना पॉझीटीव्ह अल्याने अवारपिंपरी गाव सिल करण्यात आले आहे . तहसिलदार अनिल कुमार हेळकर , पोलिस निरिक्षक सय्यद , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद यांनी अवारपिंपरी येथे भेट देऊन गाव सिल केले आहे . गावाबाहेर पडू नका सामाजीक अंतर चे पालन करून ग्रामस्थांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहन तहसिलदार यांनी ग्रामस्थांना केले असून या वेळी सरपंच  तसेच माजी सरपंच सुरेश डाकवाले  व ग्रामस्थ उपस्थित होते  नागरीकांनी फिजीकल डिस्टन्स पाळने गरजेचे आहे तरच कोरोनाचा संसर्ग रोखता येईल या साठी प्रशासना कडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात दि.22 मे पासून बस सेवा सुरु करण्यासअटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी , मात्र उस्मानाबाद ,कळंब, तुळजापुर बस स्थानकाला वगळले

Image
उस्मानाबाद जिल्ह्यात दि.22 मे पासून बस सेवा सुरु करण्यास अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी  सा. पुज्य नगरी (online news) उस्मानाबाद, दि.21 ) उस्मानाबाद जिल्हातील एस टी बस सेवा सुरू करण्यास दि २२ मे रोजी पासुन जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असुन या मध्ये , कळंब , उस्मानाबाद , तुळजापुर तीन  बस स्थानकांना वगळन्यात आले आहे .  महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणूचा (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब या तीन नगर परिषद क्षेत्रातील बस स्थानके वगळता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ब...