जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल
जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ११ ) आरोपी बजरंग उर्फ नारायण मारुती ताकमोडे, 2) सतिश बापू हगारे,3) दत्ता मारुती ताकमोडे, 4) गोपीनाथ मधु हगारे, 5) सधु बापु जेकटे, 6) बिरुदेव भानुदास जेकटे, 7) काशिनाथ मधु हगारे, 8) बाळु लक्ष्मण शिंगाडे, 9) नाना वायसे सर्व रा. ताकमोडवाडी ता. परंडा
यांनी दि. 08.05.2024 रोजी 20.30 वा. सु. ताकमोडवाडी येथे फिर्यादी नामे- शेषनाथ लिंबा भोसले, वय 39 वर्षे, रा. ताकमोडवाडी ता. परंडा यांना नमुद आरोपींनी तुझा चुलत भाउ नकुल भोसले याची पत्नी पळून गेल्याची केस पोलीस स्टेशनला करायची नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी मनिषा व मुली स्वाती, नेहा चुलत भाउ नकुल भोसले हे भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेषनाथ भोसले यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 149, भा.दं.वि.सं. अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(2)(व्हिए), 3(1) (आरएस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
Comments
Post a Comment