पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न
पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१२) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डीमध्ये विद्यार्थ्यांनी 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम, या अनोख्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता.
भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणे, हा यामागील मुख्य हेतू होता. या उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती प्रकाशझोतात आणली. याप्रसंगी महाराष्ट्रासोबत दिल्लीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जीआयएस विद्यालय त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत होते.
त्यामुळे दोन राज्यांमधील संस्कृती, कला, भाषा इ. माहितीची देवाण-घेवाण झाली. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या आगळ्यावेगळ्या माहितीचा अतिशय मोकळेपणाने गप्पा मारत आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये विविध राज्यांमधील संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत होती.
विद्यार्थ्यांनी विविध चित्रे, वस्तू दाखवत आपापल्या राज्याची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व ठळक वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्याबद्दलची माहिती, देशभक्तीपर गीत, लोकनृत्य अशा सादरीकरणातून महाराष्ट्राचे दर्शन घडवले. भारत हा अनेक राज्यांच्या एकत्रीकरणातून बनलेला महान असा देश असून विविध संस्कृतींनी समृद्ध असा देश आहे. परंतु तरीही येथे 'विविधतेत एकता' दिसून येते. ही एकता अजूनच बळकट व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाची संकल्पना नीरज वालिया यांनी प्रथमच उदयास आणली आहे. ही जागतिक पातळीवर राबवली जाणारी संकल्पना असून, यामध्ये पीडीइएचे इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डीने आपली छाप पाडली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या नेतृत्वाखाली ज्योती बोंद्रे व साक्षी पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment