लॉकडाउन काळात छुप्या मार्गाने जिल्हयात विनापरवाना प्रवेश 14 गुन्हे दाखल.”
परंडा तालूक्यातील दोन महिलेसह चौघावर गुन्हा दाखल
सा . पुज्य नगरी (online news ) उस्मानाबाद दि २८
उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने अनेक जन जिल्हात प्रवेश करीत असल्याने त्यांच्यावर त्या हद्दीतील पोलिस ठाण्यात दि 28 रोजी एकुन 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहे या मध्ये परंडा तालूक्यातील देवगाव येथिल दोन महिलांसह चौघांचा समावेश आहे .
जिल्हात विना परवाना प्रवेश करणारे 1)विजय वाले 2)सचिन मिसाळ 3)खंडु आनंदगावकर 4)वर्षा आनंदगावकर 5)दिशा आनंदगावकर 6)सुरज खंडागळे 7)मुकूंद कांबळे सर्व रा. भातागळी, ता. लोहारा हे दि. 21. ते 25.एप्रिल कालावधीत बाहेर जिल्ह्यातून मौजे भातागळी येथे आले.
तर, 8)अनिल गिराम 9)सुहासिनी गिराम दोघे रा. वडगाववाडी, ता. लोहारा हे दि. 28.रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे वडगाववाडी येथे आले. तर, 10)उर्मीला चौधरी 11)विद्या चौधरी दोघे रा. देवगाव (खु.), ता. परंडा 12)सुरज अंधारे 13)सागर अंधारे दोघे रा. हिंगणगाव, ता. परंडा हे सर्व दि. 27. रोजी बाहेर जिल्ह्यातून अनुक्रमे मौजे देवगाव, चौधरी वस्ती व भांडगाव येथे आले. तर, 14)इरशाद पठाण रा. भवानी पेठ, पुणे हा दि. 28. रोजी पुणे येथून मौजे घारगाव, ता. परंडा येथे आले. तर, 15)गोरख वाळंजकर 16)गीता वाळंजकर दोघे रा. सुकटा, ता. भुम हे दोघे दि. 28.04.2020 रोजी जामखेड, जि. अ,नगर येथून मौजे सुकटा येथे आले. तर, 17)राजेंद्र देशमुख 18)सुशांत कांबळे 19)बालाजी बनसोडे तीघे रा. गुंजोटी, ता. उमरगा हे दि. 16.04.2020 ते 17.04.2020 कालावधीत बाहेर जिल्ह्यातून गुंजोटी येथे आले. तर, 20)धनु जालन 21)संभाजी जालन 22)गणेश साळुंखे तीघे रा. डोकेवाडी 23)सुब्राव मोटे 24)सुलक्षणा आढाव दोघे रा. गिरवली, ता. भुम 25)बापु भगत 26)कोमल भगत दोघे रा. पिंपळगाव (को.), ता. वाशी हे सर्व दि. 25.04.2020 ते 26.04.2020 कालावधीत पुणे येथून आपापल्या राहते गावी आले. तसेच, 27)सुभाष कोकणे 28)ज्योती कोकणे दोघे रा. जानकापुर, ता. वाशी हे दि. 28.04.2020 रोजी नवी मुंबई येथून जानकापुर येथे आले. तसेच, 29)अमेश पवार 30)नितीन गिराम दोघे रा. वडगाव (गांजा), ता. लोहारा हे दि. 28.04.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे वडगाव (गांजा) येथे आले. तर, 31)रणजित कांबळे 32)सोनाली कांबळे दोघे रा. ईसरुप, ता. वाशी हे दाघे दि. 26.04.2020 रोजी पुणे येथून मौजे ईसरुप येथे आले.
अशा रितीने वरील सर्वांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या लॉकडाउन संबंधी विविध आदेशांचे- कायद्याचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील- ग्रामसेवक- तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना कलम 11 अन्वये दि 28 रोजी स्वतंत्र 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment