उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 18 रोजी 397 पोलीस कारवायांत 1 लाख 56 हजार ,800/-रु. दंड वसुल.”


 सा . पुज्य नगरी (live news दि 19 )

उस्मानाबाद जिल्ह्यात  लॉकडाउन  गैरवर्तन, व नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत कारवाया करून 1 लाख 56 हजार 800 रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे .

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 182 कारवाया करुन 36,100/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 142 कारवाया करुन 71,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 38 कारवाया करुन 15,200/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 35 कारवाया करुन 34,500/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

            तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न