वाळु चोरा विरूध्द परंडा महसुल विभागाची कारवाई - दोघा विरूध्द गुन्हा दाखल
सा . पुज्य नगरी online news परंडा ( दि २८ )
परंडा तालुक्यातील खासापुरीच्या उल्फा नदी पात्रातुन वाळूचे अवैद्य उत्खनन करून चोरटी वाहतुक करणाऱ्या आण्णा राम लटके, शहाजी आण्णा लटके दोघे रा. राजुरी, ता. परंडा यांच्या विरूद्ध दि २८ रोजी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
२७ एप्रील रोजी रात्री १० -३० वाजता खासापुरी धरण संपादीत उल्फा नदी पात्रातुन राजुरी येथे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू चोरून नेत असताना
मंडळ अधिकारी, जवळा (नि.)- संतोष खुळे यांना आढळुन आले
. या प्रकरणी संतोष खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघा विरुद्ध दि. २८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment