केसरी कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप करा बनसोडे यांची पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे मागणी
परंडा ( दि १८)
कोरोना व्हायरस च्या संकट काळात पिवळे रेशन कार्ड धारक मधील अंत्योदय योजना व अन्न सुरक्षा योजने मधील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे केसरी कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप करावे अशी मागणी रॉकॉ चे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांनी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे केली आहे .
दि १७ रोजी भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दारिद्र रेषेखालील यादीत खऱ्या अर्थानं काही गरजू कुटुंबांचा समावेश झाला नाही आणि त्या कुटुंबांना पिवळी शिधापत्रिका ही मिळाली नाही.. काही वंचित , शेतमजूर , कष्टकरी गरीब कुटुंबांना पिवळी शिधापत्रिका नसल्या मुळे शासनाचा लाभ अशा कुटुंबांना घेता येत नाही
तरी कृपया केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना या काळात मोफत तांदूळ व गहू ( धान्य ) वाटप करण्यात यावे...
आणि या कुटुंबांना पिवळ्या रंगाच्या शिधा पत्रिका प्रमाणे सरसकट मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदनाची प्रत उप मुख्यमंत्री अजित दादा पवार
मा. आमदार जयदेव जी गायकवाड प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग,
माजी आमदार राहुल मोटे यांना देण्यात आली आहे .
Comments
Post a Comment