चोरीच्या माला सह अरोपी गजाआड उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चोरीच्या सोयाबीनसह 3 संशयीत आरोपी ताब्यात.

सा पुज्य नगरी : (live news)उस्मानाबाद ( दि १९ )

नागनाथ दत्तु कोळगे रा. उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरा शेजारील पत्रा शेडमध्ये ठेवलेल्या 70 सोयाबीन पोत्यांपैकी 18 पोती (किं.अं. 40,000/-रु.) दि. 20.12.2019 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने शेडजा दरवाजा उघडून चोरून नेली होती. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 18.04.2020 रोजी मौजे मेडसिंगा शिवारात छापा टाकून आरोपी- 1)दादा रामा काळे रा. सांजा पारधी पिढी 2)रावसाहेब चंदर काळे रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद 3)नारायण दत्तु गवळी रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल जप्त करुन पुढील तपासकामी आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न