जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना रेशनचे धान्य मिळाले पाहिजे - पालकमंत्री शंकरराव गडाख


* गरीबापर्यंत धान्य पोहोचू न देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे  निर्देश

सा.पुज्य नगरी (उस्मानाबाद, दि.22 -)

 जिल्ह्यात रेशन वाटपाबाबत    अनेक तक्रारी येत आहेत. गोर गरिबांना रेशनवरील मंजूर गहू , तांदूळ मिळालेे पाहिजे. या गोरगरिबांना रेशनवरील धान्य योग्य पद्धतीने मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही नियम शिथिल केले आहे.   तरीही काही विशिष्ट लोक गरिबांना अडचणी आणत असतील व त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनवरील धान्य मिळू देत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री   शंकरराव गडाख यांनी दिले आहेत.

खरीप आढावा बैठकीस जिल्ह्यातील आमदार , खासदार तसेच कृषि खात्याचे अधिकारी उपस्थित होते . त्यानंतर पालकमंत्री यांनी रेशन वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला . जिल्ह्यातील किती लोकांना वाटप झाले आहे , वाटप कसे चालू आहे , याबाबत सर्व माहिती घेतली व अधिकाऱ्यांना आदेश देतांना सांगितले की माझ्याकडे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे रेशन वितरणबाबत विविध तक्रारी आल्या आहेत . गोर गरिबांना वितरण होणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करून गोर गरीब जनतेला वेळेत व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धान्य पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले .

[] [] मा.पालकमंत्री महोदय यांनी दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी च्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ चारुशीला देशमुख यांनी उस्मानाबाद शहरामधील खाजानगर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 9 ची आकस्मित तपासणी केली. या तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आलेले आहेत, तरी त्यानुसार हया दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न