परंडा न प चे मुख्याधिकारी इंगोले यांचे कार्य कौतुकास्पद ,अपुऱ्या कर्मचाऱ्या वर कोरोना विरूद्ध भक्कम लढा , आफवेवर विश्वास ठेऊ नका - मुख्याधिकारी इंगोले
नियमांचा भंग करणाऱ्या शहरातील ६ दुकानदारावर गुन्हे दाखल .
सा.पुज्य नगरी परंडा online news ) दि २४ एप्रील २०२०
परंडा नगर परिषदचे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांच्या उपाययोजने मुळे परंडा शहरात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळलेला नाही ,
जनतेने लॉकडॉऊन व सोशल डिस्टसिंग चा काटेकोर पणे पालन करावे तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये व प्रशासणास सहकार्य करावे असे अवाहन मुख्याधिकारी इंगोले यांनी केले आहे .
कोव्हीड १९ या विषाणुचा संसंर्ग रोखन्या साठी जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुंडे यांच्या आदेशाचे नगरपरिषदेच्या वतीने शाहरात अमलबजावणी करण्यात येत असल्याने या कोरोना व्हायरस वर मात करीत आहे .
शहरातील नगरीकांची गर्दी टाळन्या साठी आठवडी, व डेली बाजार पुर्वीच रद्द करण्यात आले होते , फळे व पाले भाजी घरोघरी जाऊन विक्री करण्याच्या सुचना भाजी विक्रेत्यांना देण्यात आल्याने नागरीकांना फळे व पालेभाज्या घरपोच उपलब्ध होत आहे .
शहरातील लॉक डाऊन ची अमल बजावणी साठी प्रभारी तहसिलदार तुषार बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे तर पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद यांच्या सहकार्याने शहरातील गर्दीवर नियंत्रन ठेवण्यात आले आहे .
मुख्याधिकारी दिपक इंगोले यांच्या नेतत्वाखाली नगरपरिषदेचे वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी कोरोणा व्हायरसच्या संसर्गा पासुन प्रतिबंधात्मक उपाययोजना साठी आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात काम करीत आहेत .
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, शाळा , महाविद्यालये , सर्व धार्मीक कार्यक्रम कडेकोट बंद ठेवण्यात आले आहेत . संपुर्ण शहरात मलेथॉन, सोडियम, हायपोक्लोराईड , फॉगींग, फिनेल फवारणी व नाली साफ सफाई व कचरा संकलन वेळोवेळी करण्यात येत आहे ,
नगर परिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापण कक्षाची स्थापणा करण्यात आली आहे तसेच न प च्या वतीने १ हजार सॅनिटॉयझर , व ५०० मास्कचे वाटप करण्यात आले .
तसेच तहसिल कार्यालयाच्या सहकार्याने ५२ दिव्यांग व्यक्तींना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले
शहरात प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बाहेर गावाहुन आलेल्या व्यक्तीची उपाययोजना करण्यात येत आहे .
शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी गरीब , गरजु लोकांना मदत करावी असे अवाहन मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी केले आहे . इंगोले यांच्या या कार्याचे नागरीका मधुन कौतुक होत आहे .
Comments
Post a Comment