रूपमाता उद्योग परिवाराचे एक पाऊल मानुसकीचे उस्मानाबाद येथिल गरीब विद्यार्थ्यांना भोजन ची व्यावस्था

रूपामाता उद्योग परिवाराने केली संकटकाळी मदत 

उस्मानाबाद/प्रतिनिधी दि १९ एप्रील 


कोरोना वायरस मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे या मुळे  उस्मानाबाद  शहरामध्ये शिक्षणा साठी आलेल्या  बिहार, प.पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागातील ६० विद्यार्थी अडकून पडले आहेत , या  विद्यार्थ्यांना   गेले कांही दिवस कांही लोकांनी मदत केली, परंतु लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढल्यामुळे मदतीची  आणखीन गरज निर्माण झाली आहे, अशा संकटसमय रूपामाता उद्योग परिवाराने विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय करून अनमोल कार्य केले आहे, असे मत  महमंद जाफर अली खान यांनी व्यक्त केले .

उस्मानाबाद मध्ये गाजी मैदानात दारूल उलम शमसीया ही शाळा रज्जाक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविली जाते . या शाळेत चार राज्यातील ६० अनाथ विद्यार्थी असून यांना धार्मिक शिक्षणाबरोबर नियमितचे शिक्षण उर्दू, मराठी,  इंग्रजीमध्ये देण्यात येते. लॉकडाऊनमुळे या शाळेतील विद्यार्थी आडकून पडलेले असून त्यांच्या भोजनाची कोणतीही सोय नसल्यामुळे येथे भोजनाची सोय उपलब्ध करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. 

जिल्हा प्रशासनाने रूपामाता उद्योग समूहाला त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यास सांगितले. उद्योग समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी तातडीने दखल घेवून या विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय केली. 
यावेळी राजाभाऊ वैद्य, अॅड. अजित गुंड, मिलिंद खांडेकर आदींची उपस्थिती होती. 

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न