देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करा -ॲड रेवण भोसले
सा . पुज्य नगरी (Live news )उस्मानाबाद दि 20 )
कोरोना विषाणूमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्रीय मंत्री मंडळाची शिफारस राष्ट्रपतीकडे करण्याची मागणी जनता दल सेक्युलर चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे .
भारताचे किंवा त्याच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्याची परिस्थिती उद्भवली आहे अशी राष्ट्रपतींची खात्री झाली तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राज्यघटनेतील अनुच्छेद 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर करता येते .देशाच्या इतिहासात सर्वात वाईट व व चिंताजनक आर्थिक स्थिती देशात निर्माण झाली आहे .आर्थिक आणीबाणी लागू झाल्यास आर्थिक व्यवहारा संदर्भात केंद्र सरकारला अमर्याद अधिकार मिळतात .शासकीय सेवेतील व्यक्तींच्या वेतनात व भत्यात घट करणे, न्यायाधीश व आमदार-खासदार यांच्या वेतनात कपात करण्याचा अधिकार सरकारला मिळतो .
राज्यांच्या विधानसभा नी मंजूर केलेली सर्व आर्थिक विधेयके मंजूर करण्यासाठीही राष्ट्रपतींची मोहोर घ्यावी लागते .देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट झाली असून देशातला परकीय चलन साठा संपत चालला आहे. विदेशी व्यापारातील तूट हजारो कोटीच्या घरात गेली आहे .भारताचे पतमानांकन इतके घसरले आहे की बाहेरून कर्ज घेण्यास देशाला अपात्र ठरवण्याची वेळ आली आहे .
आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर काही परिणाम होत नाही. कोरोना च्या उद्रेकामुळे एकूणच अर्थव्यवस्था व लाखो स्थलांतरित कामगारांच्या रोजीरोटी वरिल टाळेबंदी च्या परिणामामुळे गंभीर चिंतेचे वातावरण तयार झाले आहे .लॉक डाउन मुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झालेली असतांना रोकड टंचाई जाणवू नये तसेच बँकेकडे कर्ज देण्यासाठी अधिक पैसा उपलब्ध व्हावा यासाठी रिझर्व बँकेने कितीही उपाय योजना जाहीर केल्या तरी देशाची अर्थव्यवस्था रुळावर येणे महाकठीण झाले आहे .त्यामुळे देशात आर्थिक आणीबाणी शिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही .देशातील 130 कोटी जनतेवर लॉक डाऊन संपल्यानंतर भयंकर आर्थिक आरिष्ट निर्माण होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करून अर्थव्यवस्थेला रुळावर आणून देशातील जनतेला आर्थिक महा संकटातून बाहेर काढावे असे स्पष्ट मत ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment