उस्मानाबादच्या सिमा बंद केलेले असताना पुणे , मुंबई येथून येऊन आडमार्गाने जिल्हात प्रवेश करणाऱ्यावर गुन्हा दाखल
लपुन-छपून आडवाटेने जिल्ह्यात प्रवेश केला, गुन्हा दाखल.”
सा . पुज्यनगरी ( उमरगा Live news ) दि २३
उस्मानाबाद जिल्हयाची सिमा बंद केलेली असताना आडवाटेने जिल्हयात प्रवेश करून लॉक डॉऊन चा उल्लघन करणाऱ्या विरूध्द उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
रोहीणी
संतोष पुजारी, वैष्णवी संतोष पुजारी, संतोष करबस पुजारी, विठ्ठल शिवाजी दणाणे,
नितीन शिवाजी दणाणे, लक्ष्मी शिवाजी दणाणे, बालाजी बळीराम चव्हाण, रवी विठ्ठल
शिंदे, निवृत्ती अनिल जाधव, आकाश मारुती वाकुडकर सर्व रा. उमरगा हे सर्व मुंबई,
पुणे, सोलापूर, अमरावती, कर्नाटक या ठिकाणाहून दि. 17. ते 21. या
कालावधीत जिल्ह्याची सिमा बंद असतांना पोलीस नाकाबंदी टाळून आडवाटेने त्यांनी उमरगा
शहरात प्रवेश केला. अशा प्रकारे त्यांनी लॉकडाउन असतांना कोरोना विषाणु चा संसर्ग
रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना- आदेशांचे उल्लंघन करुन, स्वत:ची व इतरांची
सुरक्षीतता धोक्यात आणण्याची कृती केली. अशा मजकुराच्या बालासाहेब कानडे (नगरपरिषद
कर्मचारी) यांच्या फिर्यादीवरुन वरील संबंधीतांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Comments
Post a Comment