होम कॉरोन्टोईन केले असताना सार्वजनिक ठिकाणी वावर गुन्हा दाखल

चेन्नई येथू परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे गावी आला होता* 

सा पुज्य नगरी* परंडा ( दि १७ )

 चेन्नई येथून आल्याने डॉक्टरांनी  होम कोरोन्टाईन केले असताना देखील सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे आढळुन आल्याने सरणवाडी ता .परंडा येथील ड्रायव्हर  नलवडे यांच्या विरुध्द दि १५ एप्रील रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की परंडा तालुक्यातील सरणवाडी येथिल नलवडे हा तरूण दि १२ एप्रील रोजी चेन्नई येथुन ट्रक घेऊन सणवाडी गावी   रात्री १२ वाजेच्या सुमारास आला होता दि १३ रोजी कोरोना संसंर्ग प्रसार विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच सदरील युवकास आसु येथिल प्राथमीक आरोग्य केंद्रात तपासणी साठी पाठविन्यात होते डॉक्टरांने नलवडे यास होम कोरॅन्टाईन मध्ये राहण्याचा सल्ला दिला होता ,
मात्र नलवडे हा दि १५ रोजी गावातील  मारूती मंदीर परीससरात तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे पथकास आढळुन आल्याने त्याच्या विरूध्द    गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 [ ]  *लॉकडॉऊन चे नियम पाळुन नागरीकांनी प्रशासणास सहकार्य करावे असे अवाहन गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी केले आहे*

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न