रेशन दुकान वेळेवर उघडे ठेवण्याचे आदेश देऊन धान्य वाटप करा , श्रमीक बहुउद्देशीय संस्थेची मागणी

श्रमिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तहसीलदार यांना  निवेदन 


परांडा - (दि १८ एप्रिल २०२०

शहरातील रेशन दुकाने वेळेवर उघडत नसल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने सर्व दुकाने वेळेवर उघडे ठेऊन धान्य वाटप करावे अशी मागणी 
 येथील श्रमिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तहसीदार यांच्या कडे करण्यात आली आहे .

 श्रमिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाशा  शहाबर्फीवाले आणि या संस्थेचे सचिव मुसा हन्नुरे यांनी  दि १९ रोजी  दिलेल्या  निवेदनामध्ये म्हटले आहे की ,सध्या देशामध्ये लोक डाऊनच्या स्थितीमुळे गोरगरीब लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे .राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व रेशन दुकानदार यांनी प्रत्येकी पाच किलो धान्य सर्व रेशन कार्डधारकांना देण्यात यावे  परंतु शासनाच्या निर्देशांचे पालन  होत नसून त्या मुळे  अनेक लोकांचे हाल झालेले दिसून येत आहेत. 

अनेक वेळा धान्य आणण्यासाठी गेले असता धान्य संपले असे उत्तर रेशन दुकानदाराकडून मिळत असल्याने सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा चकरा मारून सुद्धा शेवटी तुमच्या नावाचे धान्य संपले . पूढील महिण्यात येईल असे उत्तर दुकानदाराकडून मिळत आहे असे निदर्शनास आले असल्यामुळे श्रमिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नायब तहसीलदार डॉक्टर तुषार बोरकर  यांना  सदर निवेदन देण्यात आले .

निवेदनामध्ये  पुढे म्हटले आहे की परंडा शहरातील सर्व रेशन दुकानदारांची कसून चौकशी व्हावी व सर्व जनतेस सरकारने केलेल्या आवाहनानुसार धान्य मिळावे व जास्तीत जास्त वेळे मध्ये दुकान दारांनी आपली दुकाने उघडी ठेवावीत व लॉक डाऊन मुळे प्रत्येकी दहा जण दूकानात बोलावून धान्य वाटप करावे असे निवेदनामध्ये  नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न