अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून परंडा तालुक्यातील सर्व आस्थापना 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ,एस टी बस सेवा बंद करण्याचे आदेश


 
  सा.पुज्य नगरी (online news ) उस्मानाबाद,दि.12

परंडा तालुक्यात दि ११ मे रोजी  कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने तालूक्यातील सर्व अस्थापणाला दररोज उघडे ठेवण्याची  दिलेली सुट रद्द करण्यात आली आसुन एस टी बस सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आसुन केवळ अत्यावश्यक  सेवा देणारे  अस्थापणा यांनाच दुपारी २ वाजे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे .

  महाराष्ट्र शासनाने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी  दि.17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.यातील मुद्दा क्र.2 (i)नुसार ग्रीन,ऑरेज व रेड (हॉटस्पॉट)झोनबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे.तसेच मुद्दा क्र.(ii)नुसार करोना (COVID-19) चा प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हयातील रेड झोन (हॉटस्पॉट) व ऑरेज झोन चा भाग निश्चित करणेबाबत अधिकार देण्यात आला आहे.
   
उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यामध्ये करोना विषाणू (COVID-19)चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे करोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता परंडा तालुक्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष दीपा मुधोळ- मुंडे यांनी करोना विषाणू (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी  टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यातील खालील आस्थापना वगळून.
1.शासकीय/निमशासकीय कार्यालये.
2.पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.
3.सर्व बँका.
4.दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.
5.अन्न,भाजीपाला,दूध.
6.किराणा पुरविणा-या आस्थापना (सकाळी 8 ते  दुपारी 2 या कालावधीतच सुरु राहतील.)
7.दवाखाने,वैदयकीय केंद्र व औषधी दुकाने.  
 
 
8.विदयुत पुरवठा,ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने.
9.प्रसार माध्यमे,मिडीया.
10.अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी.आस्थापना.
वरील आस्थापनाव दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यातील सर्व  आस्थापना व दुकाने दि.17 मे 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित केले आहे.
        या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. उस्मानाबाद पोलीस अधीक्षकम, उस्मानाबाद, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद, परंडा उपविभागीय अधिकारी व तहसिलदार पंरडा, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन अधिकारी, न. पा. प्र. जि. का. उस्मानाबाद, तहसिलदार परंडा, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, परंडा, तालुका आरोग्य अधिकारी, परंडा ,मुख्याधिकारी नगर परिषद, परंडा, परंडा तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापना अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपायोजना नियम-2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 12 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद