सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,
सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत .
चे.अनिल सावंत व व्हा.चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते भैरवनाथ शुगर च्या १८ व्या गळीत हंगामाचे मोळी पुजन संपन्न ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा (दि ३१ ऑक्टोंबर )परंडा तालूक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याचा १८ व्या गळीत हंगामाचा मोळी पूजन कार्यकम चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या शुभहस्ते व ऊस उत्पादक शेतकरी आणि मांन्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला.
या प्रसंगी बोलताना चेअरमन अनिल सावंत यांनी आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत असल्याचे सांगितले.तसेच याही वर्षी गाळपास येणाऱ्या ऊसास जास्तीचा भाव जाहीर करुन आ.तानाजीराव सावंत हे शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवतील अशी ग्वाही दिली.
कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा असून कारखाना गाळपासाठी सज्ज झाला असल्याचे सावंत यांनी यावेळी म्हणाले.या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा परिपक्व ऊस कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सावंत यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर,जयदेव बप्पा गोफणे,बालाजी गुंजाळ,सतिश दैन,गजेंद्र काका सुर्यवंशी, रणजीत खरसडे,मांजरे महाराज,शिवाजी सुर्यवंशी,राहूल पाटिल,कर्णे बप्पा लांडगे, सुधिर देशमुख,संतोष भुजे,प्रकाश गाढवे, कल्याण शिंदे,सचिन सोनारीकर,धोंडिराम फले,औदुंबर गाडे,रेवडे सर तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, डिस्टीलरी मॅनेजर अजित भोसले,चिफ केमिस्ट दादासाहेब बोरकर,चिफ इंजिनिअर रविकांत सिंग,कोजन मॅनेजर उदयशंकर गडगे,चिफ अकौंटंट गोविंद कुलकर्णी,शेती अधिकारी भगवान
काळे,बापूसाहेब देशमुख,कार्यालय अधिक्षक सोमनाथ सुर्यवंशी,महादेव मुळीक,सुरक्षा अधिकारी जेजेराम सुर्यवंशी,पोफळे,स्टोअर किपर लांडगे,हेडटाईम किपर सुरेश साळुंके,आबा अनवणे,भैरु गरदाडे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,तोडणी वाहतुक ठेकेदार, तसेच कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभार कारखान्याचे ई.डि.पी.मॅनेजर सुभाष भोसले यांनी मानले .
Comments
Post a Comment