अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा; अन्यथा आंदोलन लहुजी शक्ती सेनेचा इशारा ,
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा; अन्यथा आंदोलन लहुजी शक्ती सेनेचा इशारा ,
परंडा ( दि १६ मार्च ) तालुक्यात लहुजी शक्ती सेनेने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी जोरदार मागणी करत सरकारचे लक्ष वेधले आहे.
सोमवार दि. १६ मार्च रोजी लहुजी शक्ती सेना परंडा तालुका व शहर यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालय परंडा मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच कु. अनुष्का पाटोळे आणि आकांक्षा गायकवाड या मुलींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशीही मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे.
या वेळी लहुजी शक्ती सेना परंडा तालुका अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष राजश्री चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गुलाब शिंदे, संपर्कप्रमुख युवराज कसबे, सुमित दुबळे, उमेश कसबे, तुकाराम शिंदे, धनाजी अडगळे, कोर कमिटी अध्यक्ष गणेश शिंदे, सुनील दणाने, विमल चव्हाण, सोनवणे यांच्यासह अनेक लहुजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि संबंधित प्रकरणांमध्ये न्याय मिळाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे ,
प्रमुख मागण्या
अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण लागू करावे,
• न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल स्वीकारावा,
• अनुष्का पाटोळे व आकांक्षा गायकवाड मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी,
• आरोपींना तात्काळ अटक करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे ,
Comments
Post a Comment