अवैध दारू अडुयाची माहिती दिल्याने चाकु हल्ला अरोपी विरूध्द गुन्हा दाखल ,देवळाली येथिल घटणा परंडा पोलिसात गुन्हा दाखल



सा . पुज्य नगरी परंडा (online news ) दि १o

अवैध दारू अड्डयाची माहिती पोलिसांना दिल्याचा राग मनात धरून बाळासाहेब गिलबीले यांच्या वर चाकु हल्ला करण्यात आला असुन या हि घटणा देवळाली ता . भुम येथे दि ९ मे रोजी घडली या प्रकरणी आरोपी विरूद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की  अवैध दारू विक्रेते प्रकाश भागवत गोरे, प्रविण पांडुरंग शेटे, किरण भाउसाहेब पाटील, मधुकर रावसाहेब तांबे, दिनकर भागवत गोरे सर्व रा. देवळाजी, ता. भुम यांच्या दारुअड्ड्याची माहिती पोलीसांना दिल्याचा राग मनात धरुन गावातीलच- बाबासाहेब गणपती गिलबीले यांना दि. 09. रोजी दुपारी  02.30 वा. सुमारास  मौजे देवळाली शेत शिवारात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ केली. तसेच चाकूने खांद्यावर वार करुन, दगडाने मारहाण करून जखमी केले .

भांडणे सोडवण्यास आलेल्या साजीद सज्जाक शेख, लक्ष्मण भारत जाधव यांना देखील शिवीगाळ करुन, चाकुने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली .
या प्रकरणी  बाबासाहेब गिलबीले यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीं विरुध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न