रमजान ईद साधे पणाने साजरी करून गरीब कुटूंबाला मदत करावी - समीर पठाण यांचे अवाहन




सा पुज्य नगरी (online news परंडा  दि २३ मे )

लॉक डाऊन असल्याने सर्व मुस्लीम बांधवांनी रमजान ईद साठी कपडे ईतर साहित्यावर खर्च न करता गरीब  कुटूंबाला आर्थीक मदत करून ईद साधे पणाने  साजरी करावी असे अवाहन मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाअध्यक्ष समीर पठाण यांनी केले आहे.


 मुस्लीम धर्मियांमध्ये पविञ असणारा रमजान ईदचा सण मोठा मानला जातो माञ,यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी न करता ईद साधेपणाने साजरी करावी 
सध्याचा कोरोनाचा होणारा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणुन सुरक्षिततेची काळजी घेऊन,शासनाच्या  नियमांचे काटेकोर पणे  पालन करीत आवश्यकते नुसार बाजारात जावे.

 कोरोना मुळे सर्वसामान्या सह सर्वांवरच मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.मागील दोन महिन्यापासुन मजुर,कामगारांच्या हाताला काम नाही यंदा रमजान ईद सणासाठी नवीन कपडे,सौंदर्य प्रसादने,व इतर वस्तुसाठी लागणाऱ्या खर्चाची बचत करुन ईदच्या खरेदीसाठीची रक्कम समाज घटकातील गरीब गरजवंत कुंटुबाला देऊन ईद साजरी करावी.

मुस्लीम धर्मियातील सधन कुंटुबियानी गरजुवंताना  मदत करावी मुस्लीम धर्मामध्ये पाच तत्वापैकी जकातलाही विशेष महत्व दिले जाते त्यामुळे संकटसमयी मानवता धर्मांचे पालन करण्याचे अवाहन पठाण यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न