दोन महिने ओसाड पडलेले रस्ते गजबजले , नगर परिषद पोलिस प्रशासणा कडून फिजीकल डिस्टंन्सींग साठी बाजार पेठेत वाहणा साठी प्रवेश बंद ..
जिल्हा व तालुका प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद ,
सा . पुज्य नगरी (online news ) दि ११ मे
उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याने जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ , मुंढे यांनी सर्व अस्थापना नियम अटीवर सोमवार ते शनिवार पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याने गेल्या दोन महिन्या पासुन ओसाड पडलेले रस्ते सोमवार दि .११ मे रोजी पुन्हा गजबजले आहे ,
या गजबजलेल्या शहरात पालिका प्रशासन, पोलिस प्रशासणा कडून फिजिकल डीस्टंन्सिंग चे नियम पाळण्या साठी मुख्य बाजार पेठेत वाहनांना प्रवेश बंदी घालन्यात आली आहे .
परंडा तालूका कोरोना मुक्त ठेवण्या साठी तहसिलदार , अनिल कुमार हेळकर , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले,या आधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली विविध पथके स्थापण करून तालूक्यात विविध उपाय योजना राबविन्यात आल्या .
उस्मानाबाद जिल्हा सध्या जरी कोरोना संसर्ग मुक्त झालेला असला तरी या पुढे देखील काळजी घेण्याची गरज असुन या साठी तालुका प्रशासन प्रयत्न करीत आहे ,
Comments
Post a Comment