परंडा उप जिल्हा रुग्णालयात नवीन चार कोरोना बाधीत रुग्ण दाखल ,सरणवाडी येथिल रूग्णावर उपचार करून डिस्चार्ज
खंडेश्वरवाडी गाव सिल १६ व्यक्तीना कोरंन्टॉईन
सा . पुज्य नगरी (online news ) दि २० मे
परंडा तालूक्यातील सरणवाडी येथिल कोरोना बाधीत रूग्णावर उपचार करून अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला असुन परंडा तालूक्यातील खंडेश्वरवाडी येथिल दोन तर भुम तालूक्यातील दोन असे चार को रोना बाधीत रुग्णावर उपचार सुरू आहे या मध्ये एका महिले सह १३ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे .
हे सर्व रुग्ण मुंबई , पुणे येथून प्रवास करून आलेले आहेत परंडा तालूक्यातील सरणवाडी पाठोपाठ खंडेश्वरवाडी येथील दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खंडेश्वरवाडी गाव सिल करण्यात आले आहे .
कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व उपाय योजना करण्यात येत आहे
[ ] खंडेश्वरवाडी येथिल कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ व्यक्तींना कोरंन्टाईन करण्यात आले असुन सर्वाचे स्वॅब नमुने घेऊन तपासणी साठी पाठविण्यात येणार असल्याचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद यांनी सांगीतले .
Comments
Post a Comment