जुन्या भांडनाचा राग धरून मामाची दगडाने ठेचुन हत्या भुम तालूक्यातील घटना
पुज्य नगरी भुम ( online news ) दि २२ मे ,
जुन्या भांडनाचा राग मनात धरून विलास आबासाहेब गोयकर रा. आरसोली ता.भुम याने गावातील मामा- बाबासाहेब शिवाजी वाघमोडे वय ४६ वर्षे, यांची दगडाने ठेचुन हत्या केली ही घटणा भुम तालूक्यातील आरसोली येथे दि २१ मे रोजी घडली या प्रकरणी भुम पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की विलास गोयकर व बाबासाहेब वाघमोडे यांच्या सोबत एक वार्षापुर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन मामा- बाबासाहेब वाघमोडे यांना विलास गोयकर याने मोटारसायकलवर दि. २१ रोजी ४ वाजेच्या सुमारास भुम एम.आय.डी.सी. शिवारातील बाणगंगा नदी काठावर नेउन बाबासाहेब वाघमोडे यांना दगडाने मारुन जिवे ठार मारले
या प्रकरणी श्रीमती सुनंदा बाबासाहेब वाघमोडे (मयताची पत्नी) यांच्या फिर्यादीवरुन विलास गोयकर याच्याविरुध्द गुन्हा दि. २१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment