सिल केलेल्या सरणवाडी येथिल ग्रामस्थांना - माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची मदत ५० कुटूंबांना किराणा माला सह पालेभाज्या वाटप
सा पुज्य नगरी (online news परंडा ( दि १८ )
परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने गाव सिल केल्याने गावातील गरीब कुटूंबावर उपास मारीची वेळ आल्याने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील मदती साठी धाऊन आले असुन त्यांच्या वतीने दि १८ रोजी रणजित पाटील यांच्या हस्ते ५० कुटूंबांना किराणा मालासह पालेभाज्याचे वाटप करण्यात आले .
गाव सिल केल्याने गावातील ग्रामस्थांना बाहेर पडल्यास बंदी केली असल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड पडली असुन आर्थीक अडचणी मुळे . गावातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे.
गावातील ग्रामस्थ हातावर पोट असणारे असल्यामुळे, जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती लोकाना अन्नधान्याची गंभीर समस्या निर्माण झालेचे लक्षात येताच. भाजीपाल्यासह अन्न,धान्य, तेल-तिखट आदींचा पुरवठा ज्ञानेश्वर पाटील यांच्या कडून करण्यात आला .
Comments
Post a Comment