भुम प.स शिवसेना सदस्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या देवळाली ता . भुम येथिल घटणा परंडा पोलिसात गुन्हा दाखल



 सा . पुज्य नगरी online news  परंडा ( दि २७ मे )

शेत रस्ता कामाच्या कारणा वरील राग व जुगार अड्डयाची माहिती दिल्याच्या संशयावरून देवळाली ता भुम येथिल  शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बाजीराव तांबे यांची  धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली ही घटणा देवळाली ता . भुम येथे दि २६ मे रोजी रात्री ८ - ३० वाजता घडली या प्रकरणी परंडा पोलिसात १२ जना विरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की देवळाली ते वंजारवाडी शेत रस्त्याच्या कारणा वरून यातील आरोपी सोबत बाजीराव कल्याण तांबे यांच्या सोबत दि ९ मे रोजी भांडण झाले होते तसेच प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारून कारवाई केली होती जुगार अड्डयाची माहिती बाजीराव यांनी च पोलिसांना दिली असा संशय यातील आरोपींनी घेतला होता .
याच कारणाने मनात राग धरून आरोपी चंद्रकात रावसाहेब तांबे , सुर्यकांत रावसाहेब तांबे , मधुकर रावसाहेब तांबे , रामनाथ चंद्रकांत तांबे , किरण भाऊसाहेब तांबे , प्रविण लिंगप्पा शेटे , आभिजित लिंगप्पा शेटे , श्रीपती भारत विधाते , प्रकाश भगवान गोरे , दिनकर ऊर्फ दिनेश गोरे , फकीरा गोरे , चंद्रकांत दिनानाथ शेटे सर्व राहणार देवळाली यांनी संगणमत करून व पाळत ठेऊन  बाजीराव तांबे हे मोटार सायकल वरून बार्शी येथे जान्या साठी निघाले असता ग्रामपंचायत कार्यालया समोरील रस्त्यावर त्यांची मोटार सायकल अडऊन धारदार हत्याराने बाजीराव कल्याण तांबे यांच्या पोटात भोसकुन व हतावर वार करून हत्या केली ,

गंभीर जखमी बाजीराव तांबे यांना उपचारा साठी  तातडीने बार्शी येथिल जगदाळे मामा हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा मुत्यू झाला  घटने ची माहिती मिळताच भुम चे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटणा स्थळी भेट दिली देऊन पाहणी केली  पोलिसांनी घटणा स्थळाचा पंचनामा करून वरील १२ आरोपी विरुद्ध परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलिस निरिक्षक सय्यद हे करीत आहेत .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न