अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती आवारपिंपरी येथे रक्तदान करून साजरी.


पुज्य नगरी परंडा (online news दि ३१ मे

 महाराणी अहिल्यादेवी यांची २९५ वी जयंतीचे औचित्य साधुन परंडा तालूक्यातील अवारपिंपरी येथे दि. ३१ मे रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले या वेळी ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

 मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष मा .सुरेश भाऊ कांबळे यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करून जयंती  साजरी करण्याचे आवाहन  केले होते या नुसार  आवारपिंपरी येथील महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीने रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी केली 
रक्तदान शिबिरात प्रथमतः आहील्यादेविंच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यात प्रामुख्याने महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला  
शिबिर यशस्वी करण्यात   मा.सरपंच सुरेश डाकवाले, प्रा.सुभाष मारकड सर,महावीर नरुटे,दादासाहेब पाडुळे,विश्वास गूडे, विजय शेळके, डॉ.विजयकुमार नरुटे,तानाजी नरुटे,श्रीराम नरुटे,तानाजी ओव्हाळ,अमोल गुडे,योगेश नरुटे,अतुल नरुटे,पै.अंकुश डाकवाले,राकेश सुसलादे,प्रवीण डाकवाले,कृष्णा नरुटे,बालाजी नरुटे,अमर ओव्हाळ, महारुद्र गुडे, बाळू चतुर,गौतम ओव्हाळ, विलास जाधव,कैलास घोडके,रोहित दोलतोडे,सुनील शिरतोडे आदी युवकांनी परिश्रम घेतले..

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न