परंडा तालूक्यातील सिल केलेले सरणवाडी व ब्रम्हगाव ला २४ तास पहारा,रुग्णावर परंडा येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार
अरोग्य विभागाच्या पथका कडून प्रत्येक नागरीकांची दररोज तपासणी
सा . पुज्य नगरी (परंडा online news) दि १४ मे
परंडा तालूक्यातील सरणवाडी येथिल एका ३० वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासना कडून खबरदारीची उपाययोजना म्हणुन सरणवाडी व लगतचे ब्रम्हगाव तातडीने सिल करण्यात आले या दोन्ही गावांना पोलिस व महसुल कर्मचाऱ्या कडून २४ तास पहारा देण्यात येत आहे.
सरणवाडी येथिल त्या ड्रायव्हर चा रिपोर्ट दि ११ रोजी कोरोना पोझीटिव आला होता या नंतर तहसिलदार तथा तालुका ( incedent commender) अनिल कुमार हेळकर , यांच्या नेतृत्वा खाली , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , तालुका अरोग्य अधिकारी डॉ सय्यद, पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद, मुख्याधिकारी दिपक इंगोले यांची बैठक झाली व कोरोना चा संसर्ग तालुक्यात रोखन्या साठी तातडीने सरणवाडी व ब्रम्हगाव हे दोन्ही गावे सिल करण्यात आले .
त्या सिल केलेल्या गावात एकाही वक्तीस प्रवेश देन्यात येत नाही तसेच गावातील व्यक्तीस गावा बाहेर पडण्यात प्रतिबंधीत करण्यात आले असुन त्याची कठोर अमल बजावनी करण्या साठी पोलिस व महसुल विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे .
सिल केलेल्या गावातील प्रत्येक नगरीकांची घरोघरी जाऊन दर रोज आरोग्य तपासणी करण्यात येत असुन या साठी अरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे .
त्या कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेले अनेकांचे स्वाब नमुने तपासणी केले आहे तर २३ जनांना कोरंटाईन करण्यात आले आहे . तो रूग्ण आणखी कोणाच्या संपर्कात आला होता का याचा तपास केला जात आहे ,
कोरोना बाधित रुग्णाला परंडा येथिल उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले असुन त्याच्यावर अॅलोपथी उपचार करण्यात येत असुन त्या रूग्णावर आयुवेर्दिक उपचार करण्यात येणार असल्या चे डॉ आनंद मोरे यांनी सांगीतले
Comments
Post a Comment