अवैध वाळू उत्खनन रोखन्या साठी निघालेल्या तलाठी यांचा अपघात किरकोळ जखमी , घटणे नंतर टॅक्टर चालक पसार


परंडा तालूक्यातील घटणा , टॅक्टर चालक पसार  

सा. पुज्य नगरी (online news परंडा ( दि २३ )
परंडा तालूक्यातील तांदूळवाडी , धोत्री शिवारात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्या साठी  निघालेले  तांदूळवाडी सज्याचे तलाठी गुणाजी ढोणे  यांच्या व्यॅगनर ला   टॅक्टर चा कट बसल्याने त्यांचे वाहन  रोड साईटच्या खड्डयात गेले या अपघातात ते  किरकोळ जखमी झाले ही घटणा दि २२ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली या घटने नंतर टॅक्टर चालक पसार झाला .

खैरी नदी पात्रातुन तांदुळवाडी , धोत्री शिवारात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती तलाठी ढोणे यांना मिळाल्याने   कारवाई करण्या साठी जात  असताना समोरून आलेल्या रिकाम्या टॅक्टरचा  त्यांच्या व्यॅगनर वाहणाला धोत्री शिवारातील अरूंद रस्त्यावर कट बसल्याने त्यांचे  वाहण रोड लगतच्या खुडयात गेले या अपघातात त्यांना कीरकोळ मार लागला आहे तर व्यॅगनर चे नुकसान झाले आहे .

परंडा तालूक्यातील विविध भागाच्या नदी पात्रातुन रात्री वाळुची अवैध उत्खनन करून वाहतुक होत आहे . वाळू चोरी रोखन्या साठी महसुल विभागाच्या  पथका कडून रात्री गस्त घालन्यात येत असुन तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शना खालील  पथकाने गेल्या आठवड्यातच भोत्रा रोड येथे दि १८ मे रोजी रात्री ९- ३० वाजेच्या सुमारास  अवैध वाळू वाहतुक करणारा टॅक्टर पकडून कारवाई केली होती .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न