लॉक डाऊन काळात कर्तव्य बजावनाऱ्या पोलिसावर हल्ला आरोपी योगेश देवकर विरुद्ध गुन्हा दाखल , तुळजापुर येथिल घटणा
पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.”
सा.पुज्य नगरी( online news )
तुळजापूर दि 6 मे
लॉक डाऊन काळात तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या योगेश देवकर याने विचारणा करणाऱ्या पोलिसावर हल्ला करून मारहान केली हि घटणा तुळजापुर येथे दि 6 रोजी दुपारी घडली या प्रकरणी आरोपी देवकर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल- अमोल भोपळे दि. 06. रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरात मोटार सायकल गस्त करीत असताना यावेळी योगेश अचित देवकर रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर हा नाका- तोंडास मास्क न बांधता, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन विना क्रमांकाच्या मोटार सायकल वर फिरत होता यावर पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोपळे यांनी त्यास हटकले असता त्याने जवळचा स्टिल डबा त्यांच्या डोक्यात मारुन, धक्काबुक्की करुन अंधाराचा फायदा घेउन पळुन गेला.
अशा प्रकारे वरील आरोपीने लोकसेवकाच्या (पोलीसाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा केला. अशा मजकुराच्या पो.कॉ- अमोल भोपळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपींविरुद भा.दं.वि. कलम- 353, 333, 332, 188, 269 सह, साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये दि. 06. रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Comments
Post a Comment