परंडा येथे अवैध वाळू वाहतुक करणारा टॅक्टर महसुल पथकाच्या जाळ्यात , वाळू माफीयावर कडक कारवाईची गरज ,



सा पुज्य नगरी  (परंडा  दि १८ मे २०२० )
लॉक डाऊन काळात महसुल व पोलिस यंत्रना व्यस्त असल्याने परंडा तालूक्यात वाळू माफीयांनी पुन्हा डोके वर काढले असून   रात्री च्या अंधारात अवैध वाळू उत्खनन करून चोरटी वाहतुक राजपणे करण्यात येत आहे  दि १८ मे रोजी रात्री ९ - ३० च्या सुमारास भोत्रा रोड येथे  अवैध वाळू उत्खनन विरोधी पथकाने अवैध वाळू वाहतुक करणारा टॅक्टर पकडला आहे . या वाळू माफीया वर  कडक कारवाईची गरज आहे 

  या बाबत आधिक माहिती अशी की परंडा तालूक्यातील विविध भागातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचे  अवैद्य उत्खनन करून चोरटी वाहतुक होत असल्याने तहसिलदार आनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शना खाली  दि १८ रोजी  रात्री नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड, तलाठी जीनेरी, यांच्या सह अवैध वाळू उत्खनन विरोधी पथकाने  पोलिस   बंदोबस्तात वाळूच्या टॅक्टर चा पाठलाग करून  परंडा भोत्रा रोडवर पकडला महसुल पथकाच्या धडक कारवाई ने वाळू माफीयांचे धाबे दणानले आहे .

 वाळू माफीया वर कडक  दंडात्मक कारवाई  केल्यास परंडा तालूक्यातील वाळू चोरीवर मोठया प्रमाणात आळा बसेल

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न