किरकोळ कारणावरून प्राण घातक हल्ला परंडा तालूक्यातील जवळा ( नि) येथिल घटणा चौघा विरूध्द गुन्हा दाखल



सा.पुज्य नगरी (online news , ) दि  ३  मे २०२०

कीरकोळ कारणा वरून तरूणाच्या डोक्यावर लोखंडी सळईने घाव घालुन गंभीर जखमी केले ही घटणा परंडा तालुक्यातील जवळा ( नि ) येथे दि १ मे रोजी सायंकाळ ७ वाजता  घडली या प्रकरणी चौघा आरोपी विरूध्द दि ३ मे रोजी  परंडा पोलिसात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी गणेश तनपुरे हे  त्यांच्या चार चाकी वाहणा मध्ये पाणी घेऊन घरी येत असताना रस्त्यावर अडवी उभी केलेली मोटार सायकल बाजुला घे असे म्हणताच  यातील आरोपींनी रस्ता तुझ्या बापाचा आहे का असे म्हणत  नितीन सांगडे , विकास सांगडे , गणेश सांगडे , कुमार गवारे यांनी लाथा बुक्यानी मारहान करण्यास सुरुवात केली 
भांडणाचा अवाज ऐकुन गणेश  तनपुरे याचा भाऊ भागवत तनपुरे, आई , वडील  धावत आल्यावर यातील आरोपीने  भागवत यांच्या डोक्यात लोखंडी  सळई चा घाव घातला या मध्ये भागवत गंभीर जखमी होऊन जमीनीवर चक्कर येऊन कोसळला ,

जखमीला परंडा उप जिल्हा रुगालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा साठी बार्शी येथिल जगदाळे मामा हॉस्पीटल मध्ये  दाखल करण्यात आले आहे . गणेश तनपुरे यांच्या फिर्यादी वरून चौघा आरोपी विरुद्ध दि ३ रोजी भादवी कलम ३०७ , ३४१ , ३२३ , ३२४ ,५०४ , ५०६ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पुढील तपास पो उप निरिक्षक साहेबराव राठोड हे करीत आहेत .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न