गांजांची वाहतुक करताना दोघांना अटक 19 लाखाचा “98 किलो (गांजा) जप्त,
सा .पुज्य नगरी न्युज , (नळदुर्ग दि18 जुन 2020 )
तुळजापुर तालुक्यातील आणदुर परिसरातील महामार्गा वरून गांजा या अमली पदार्थाची वाहतुक करताना पोलिसांनी दोन गांजा तस्कराला अटक करून 19 लाख 59 हजार 200 रुपये कीमतीचा 98 किलो गांजा जप्त केला असुन दोघा आरोपी विरुद्ध नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक, राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक, संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर दिलीप टिपरसे यांच्या पथकास अवैध गांजा वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ही हकीकत पोलीस अधीक्षक, . राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक,. संदीप पालवे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17.06.2020 रोजी रात्री 10 -30 वा. मौजे अणदूर येथील महामार्ग परिसरात तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाचक- सपोनि रोडगे व नळदुर्ग पो.ठा. चे प्रभारी अधिकारी- सपोनि जगदीश राऊत, नायब तहसीलदार- भारती यांच्या पथकाने गोपनीय सापळा लावला.
सापळ्या दरम्यान दि. 18.06.2020 रोजी रात्री 02.45 वा. सु. मौजे अणदूर येथील देशमुख वस्ती परिसरात असणाऱ्या महामार्गाच्या सिग्नल जवळ नळदुर्ग- सोलापूर रस्त्यावर एक संशयीत कार क्र. एम.एच. 25 एएल 9199 जात होती. पोलीसांनी ती कार आडवून कारची झडती घेतली. यात कार मधील बाळासाहेब दशरथ परबत, रा. तडवळे (म.), ता. माढा, जि. सोलापूर ,सोमनाथ दत्तात्रय कदम, रा. कदमवस्ती कोन्हेरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर या दोघांनी 97.96 कि.ग्रॅ. गांजा (किं.अं. 19,59,200/-रु.) हा अंमली पदार्थ अवैधपणे बाळगला असल्याचे आढळले. यावरुन दोघा व्यक्तींना ताब्यात घेउन गांजा व कार, मोबाईल फोन असा एकुण 34,69,200/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावरुन नळदुर्ग पो.ठा. चे प्रभारी अधिकारी- सपोनि जगदीश राऊत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोघा आरोपींविरुध्द एन.डी.पी.एस. कायदा कलम- 20 (ब) अन्वये गु दि. 18. जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment