योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या 306 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


पुज्य नगरी न्यूज (दि. 26 जुन )

श्री योगीराज कल्याण स्वामी यांच्या 306 व्या पुण्यतिथी निमीत्त विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शुक्रवार  26 जुन ते  3 जुलै या कालावधीत हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 

यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार नसून दूर दृष्य श्राव्य माध्यमातून सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत . तसेच मंदिरामध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी नाही .त्यामुळे यंदा सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह द्वारा होणार आहेत.

पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातून होणार आहेत . कल्याण स्वामी मठ परंडा या फेसबुक पेजवर या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे .या फेसबुक पेजला लाइक करून कीर्तन ,प्रवचन हे कार्यक्रम पाहता येतील . तसेच सामुहिक दासबोध पारायणाचे  आयोजन करण्यात आले आहे .सर्व भक्तांनी दासबोध पारायण आपल्या घरी करायचे आहे .यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव  'पारायण आपल्या घरी प्रवचन कीर्तन आपल्या दारी ' या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे 

पुण्यतिथी उत्सवात  स. भ. दतात्रय रत्नाळीकर , स .भ  दामोदर रामदासी,  स. भ . डॉ  मंजुषा कुलकर्णी यांची प्रवचन सेवा होणार आहे . तसेच स. भ. प्रिया सुरवसे -पवार , स. भ .कु मृण्मयी लांडगे , हभप संजयानंद महाराज झानपुरे , स. भ..हनुमंत बुवा ग्रामोपाध्ये ,  हभप रामभाऊ महाराज 
निंबाळकर,  स. भ. गणेश बुवा रामदासी , स. भ.  चि. ओंकार वैद्य  ,   स. भ. कु.  सायली देवधर यांची कीर्तने होणार आहेत.  

शुक्रवार दि. 3 जुलै रोजी  सकाळी 10.30 वा  मिरज येथील वेण्णा स्वामी मठाचे मठपती स. भ. कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे . गुलाल पुष्पवृष्टीसह उत्सवाची सांगता होणार आहे . दर वर्षी होणारा परंडा - डोमगाव पायी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे .

समर्थ भक्तांनी या सर्व कार्यकमांत सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात आले आहे 

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न