उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायती पैकी 510 ग्रामपंचायती मध्ये मग्रारोहयोची कामे सुरु


   पुज्य नगरी  - (online news  उस्मानाबाद, दि १ जुन  )

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर ‍जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी आज रोजी एकूण 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु आहेत. त्या कामांवर एकूण 1172 हजेरी पत्रके निर्गमित केली आहेत. या कामांवर एकूण 12 हजार 251 मजुरांची उपस्थिती आहे.

  वरील कामांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 910 कामे, कृषि विभागाची -95, सामाजिक वनीकरण-34, वन विभागाची-35, रेशीम विभागाची-81 व जलसंधारण विभागाच्या 17 कामाचा समावेश आहे. या कामामध्ये घरकुलाची 178 कामे, वैयक्तिक सिंचन विहिरी - 270, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर-361, तुती लागवड-82, फळबाग लागवड -69, वृक्ष लागवड -41, गाळ काढणे -30 व इतर कामे मनरेगा अंतर्गत सुरु असून जिल्ह्यामध्ये मजुरांच्या मागणी प्रमाणे मजुरांना कामे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत आहे. 
      कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर हँड सॅनिटायझर, साबण, मास्क इत्यादी साहित्य मजुरांना उपलब्ध करुन दिले असून सामाजिक अंतर (Social Distance) चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे 
        

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न