जमीअते उलेमा ए हिंद संघनेच्या वतीने परंडा शहरात होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप
सा . पुज्य नगरी परंडा ( दि १ जुन २०२० )कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपथी औषधाचे जमिअतल उलेमा ए हिंद संघटनेच्या वतीने दि १ जुन रोजी परंडा शहरातील नागरीकांना मोफत वाटप करण्यात आले.परंडा येथिल होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर मकबुल हान्नुरे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली शहरातील सहारा मेडीकल , तसेच रिपाईचे प्रदेस चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या निवास्थानी , व् डॉ मकबुल हान्नुरे यांच्या फातेमा क्लीनिक येथे सिबीराचे आयोजन करून नागरीकांना मोफत औषध वाटप करण्यात आले ,या वेळी मन्नान बसले , संजयकुमार बनसोडे तसेच जामि यतुल उलेमा ए हिंद संघटनेचे पदाधिकारी करपुडे , पठाण तसेच कुनाल जाधव , भिक्कन बासले , सुभाष देशमाने ,काटवटे , धनंजय परंडकर उपस्थित होते
Comments
Post a Comment