पुज्य नगरी वृत्ताची दखल खासगाव येथिल रस्ता काम प्रकरणी तांत्रीक अधिकारी , ग्रामसेवक , ग्रामरोजगार सेवक यांना खुलासा सादर करण्याचे आदेश
पुज्य नगरी online news परंडा दि ( १० जुन २०२० )
परंडा तालुक्यातील खासगाव येथे मग्रारोहयो अंतर्गत रस्त्याचे काम यंत्रा द्वारे करून बोगस हजेरी पत्रके भरून शासनाची फसवणुक या मथळ्या खाली पुज्य नगरी मध्ये दि ५ जुन रोजी वृत्त प्रकाशीत झाले होते.
या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागातील आधिकारी गायकवाड यांनी
सबंधितांना नोटीस बजावन्याचे आदेश दिल्याने
दि ९ जुन रोजी पंचायत समितीचे गट विकास आधिकारी रावसाहेब चकोर यांनी कर्मचारी तांत्रीक अधिकारी , ग्रामसेवक , ग्रामरोजगार सेवक यांना खुलासा सादर करावा असे लेखी आदेश दिले आहे या मुळे बोगस कामात सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे .
या बाबत आधिक माहिती अशी की मजुरांच्या हाताला कामे मिळावे म्हणुन परंडा तालूक्यात अनेक ठिकाणच्या रोहयो अंतर्गत रस्ता कामाला मंजुरी देण्यात आली आहे मात्र परंडा तालुक्यातील खासगाव हद्दीतील सोनगीरी जिप शाळा ते रुई पालकी शेतरस्ता या अडीच किलो मिटर लांबीच्या २१ लाख रुपये किमतीच्या रोहयो अंतर्गत रस्ता कामावर मजुर न लावता रस्त्याचे काम यंत्राद्वारे करण्यात येत आहे.
ग्रामरोजगार सेवक यांने या कामावर मजुर हजर नसताना देखील हजर असल्याचे दाखऊन बोगस मस्टर काढण्याचा प्रयत्न करून शासनाचे लाखो रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे या मध्ये काही कर्मचारी यांच्याशी संगणमत असल्याने मग्रारोहयो कामात गैरप्रकार घडत आहे .
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन परंडा येथिल मग्रारोहयो च्या गैर कारभार प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे
Comments
Post a Comment