परंडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूलकडून गुणवंताचा सत्कार


 
पुज्य नगरी न्यूज  परांडा (दिनांक : 26 जुन )

परंडा येथिल  संत मीरा पब्लिक स्कूल च्या वतीने परंडा तालुक्यातील व जिल्ह्यतील  विविध स्पर्धा परीक्षा व जवाहर  नवोदय  परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंताचा सत्कार स्कुल चे संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .

मागील आठवड्यात  स्पर्धा परिक्षा व जवाहर नवोदय परिक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये परांडा तालुक्यातील रोसा या गावचे सुपुत्र  अजिंक्य गोडगे यांची उप जिल्हाअधिकारी म्हणून निवड झाली, तसेच परांडा येथील  नवोदय परीक्षेत कु. सोहम दैवान पाटील याचा सोलापूर जिल्ह्यात प्रथम तर कु ज्ञानेश्वर  समाधान गवारे याचा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला, आणि नवोदय विध्यार्थी मार्गदर्शक सुजीत देशमुख सर  या सर्वांचा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष व संत मीरा पब्लिक स्कूल चे संस्थापक डॉ. प्रतापसिंह  पाटील यांच्या हस्ते झाडाची रोपे देऊन सत्कार  करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

 यावेळी शाळेचे प्राचार्य संतोष भांडवलकर, डोणजे कृषी विद्यालयचे प्राचार्य अशोक राठोड, डोमगावचे प्रगतीशील बागायतदार  प्रवीण पाटील, अशोक सोने पाटील,  शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न