धार्मीक स्थळे वगळता सर्व अस्थापणे दररोज सुरू ठेवण्याची परवानगी, रात्रीची संचारबंदीचे आदेश जारी
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा पालन करन्याचे जिल्हाधिकारी यांचे अवाहन
पुज्य नगरी ( उस्मानाबाद, दि. २ मे )
धार्मीक स्थळे वगळता नियम व अटीच्या अधिन राहुन सर्व अस्थापणे दर रोज सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे अटी नियमांचे उलंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे .
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दिपा मुधोळ-मुंडे यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 01 जून 2020 पासून ते 30 जून 2020 रोजीचे 24.00 वाजे पर्यत खालीलप्रमाणे कार्यवाही कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
1) कोविड 19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देश
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दि. 31 मे 2020 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या कोविड-19 च्या व्यवस्थापनासंदर्भातील राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
२) रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW)
सर्व अत्यावश्यक बाबी वगळून रात्री 9.00 ते सकाळी 5.00 या कालावधीत व्यक्तीच्या हालचालींना कडक प्रतिबंध राहील.
3) संवेदनशील व्यक्तीचे संरक्षण
65 वर्षावरील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. (अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवेसाठी होणारी हालचाल वगळून)
4) CONTAINMENT ZONE मध्ये करावयाची कार्यवाही
उस्मानाबाद जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येईल त्याठिकाणी CONTAINMENT ZONE जाहीर करण्याचे अधिकार संबंधित उपविभागाचे INCIDENT COMMANDER म्हणून उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रासाठी राहतील. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील. याबाबत सर्वाना सूचित करतील.
हे आदेश CONTAINMENT ZONE वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहील. तसेच भविष्यामध्ये जर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्याठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहीर करुन वेगळा आदेश काढून त्या झोन
मध्ये कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील. याबाबत सर्वाना सूचित करतील.
CONTAINMENT ZONE मध्ये फक्त अत्यावश्यक बाबींना परवानगी राहील. CONTAINMENT ZONE मध्ये CONTAINMENT ZONE मधून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या हालचालींना (वैदयकीय निकड व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा वगळता) सक्त मनाई राहील. याअनुषंगाने भारत सरकाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचना विचारात घेण्यात याव्यात.
5) खालील बाबी जिल्ह्यामध्ये चालू राहतील.
या आदेशाच्या मुद्दा क्र. 6 मध्ये नमूद केलेल्या बाबी वगळून ज्या उपक्रमांवर बंदी घातलेली नाही, असे उपक्रम व बाबी खालील अटींवर चालू राहतील.
1. परवानगी देण्यात आलेले उपक्रम हाती घेण्यासाठी, चालू करण्यासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही.
2. क्रीडा संकुलाची बाहेरील खुली जागा व स्टेडीयम तसेच इतर सर्व सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायाम, सरावासाठी खुल्या राहतील. तथापि प्रेक्षकांची उपस्थिती असणार नाही. सांघिक क्रीडा प्रकार करण्यास परवानगी असणार नाही. आतील जागा (Indoor portion) व स्टेडियममधील इमारती (Indoor stadium) मध्ये कोणत्याही उपक्रमांना परवानगी असणार नाही. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर उपक्रम सामाजिक अंतराचे (Social Distancing) निकष पाळून करावेत. यासंदर्भात या आदेशासोबतच्या परिशिष्ट 2 मधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
3. सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना खालीलप्रमाणे प्रवासी अनुज्ञेय राहतील.
दुचाकी वाहन 1 चालक, तीन चाकी वाहन 1+2, चार चाकी वाहन 1+2 याप्रमाणे राहील.
सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजना करुन विहित केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु राहील. यासंदर्भात सदर आदेशासोबतच्या परिशिष्ट-3 मधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सर्व मार्केट, दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उघडी राहतील. तथापि, कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे (Social Distancing) निकष पाळले गेले नाही अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट, दुकाने शासकीय यंत्रणेकडून तात्काळ बंद करण्यात येतील.
उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील. तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24x7) चालू राहील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज 24 तास (24x7) चालू राहतील.
उस्मानाबाद जिल्हयातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच सांयकाळी 5 ते सांयकाळी 9 वाजेपर्यंत घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास परवानगी राहील.
सर्व प्रकारची औषधी दुकाने, फार्मसी, जन औषधी केंद्रे आणि वैद्यकीय उपकरणांची दुकाने (चष्म्याच्या दुकानांसह) दररोज 24 तास (24 x 7) चालू राहतील.
संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात बी-बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील.
रेस्टॉरंन्टस मध्ये फक्त स्वयंपायकगृह चालू ठेवून अन्न पदार्थाची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी ) देण्यास सकाळी 9 ते सांयकाळी 7 या वेळेत परवानगी राहील.
किराणा दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चालू राहतील.
भाजीपाला मार्केट, भाजीपाला विक्री, दूध विक्री, दूध विक्री केंद्र दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गावरील धाबे दररोज 24 तास (24x7) चालू राहतील.
पान, तंबाखू इत्यादी पदार्थांची दुकाने बंद राहतील.
आदेशामध्ये नमूद केलेल्या गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्हयात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
आदेशामध्ये नमूद गृह विलगीकरण (Home Quarantine) च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करणे बाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
6. खालील बाबींना जिल्हयामध्ये प्रतिबंध राहील.
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस इत्यादी संस्था बंद राहतील.
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी वाहतूक (भारत सरकारचे गृह मंत्रालयाने दिलेली परवानगी वगळता), मेट्रो रेल्वे सेवा, रेल्वेद्वारे प्रवाशांची वाहतूक व देशांतर्गत विमान प्रवास (स्वतंत्र आदेश व प्रमाणित कार्यपध्दती (SOP) द्वारे विशिष्ट पध्दतीने परवानगी दिलेली नसल्यास), सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, चित्रपट गृहे, कला केंद्रे, बार व सभागृहे आणि तस्सम ठिकाणे बंद राहतील.
सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर सभा संमेलने. धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे जनतेसाठी बंद राहतील.
केश कर्तनालये, स्पॉज, सलून्स, ब्युटी पार्लर्स, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व इतर आतिथ्य सेवा या बाबींवरील निर्बंध शिथिल करणे व त्या चालू करणे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून टप्प्याटप्प्याने प्राप्त होणाऱ्या प्रमाणित कार्यपध्दती (SOP) नुसार, मार्गदर्शक सूचना ( Guidelines ) नुसार कार्यवाही करण्यात येईल.
विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तूंची हालचाल सुनिश्चित करण्यासाठी विशेष निर्देश.
वैद्यकीय व्यावसायिक, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व रुग्णवाहिका यांच्या आंतरराज्य व राज्यांतर्गत हालचालींस कोणतेही निर्बंध असणार नाहीत. तथापि व्यक्तींच्या आंतरराज्य व आंतरजिल्हा हालचालीकरिता असलेले नियंत्रण चालू राहील. अडकलेले मजूर, स्थलांतारित कामगार, यात्रेकरु, पर्यटक इत्यादींची हालचाल निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती (SOP) नुसार चालू राहील.
त्याचप्रमाणे विशेष श्रमिक रेल्वे व जहाजांद्वारे व्यक्तींची हालचाल निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती (SOP) नुसार चालू राहील.
परदेशात अडकलेले भारतीय नागरिक, परदेश प्रवासासाठी निर्दिष्ट केलेल्या व्यक्ती, परदेशी नागरिकांची सुटका , भारतीय समुद्री जहाजांचे आगमन-निर्गमन निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती (SOP) नुसार चालू राहील.
सर्व प्रकारच्या वस्तू व मालाच्या आंतरराज्य वाहतूकीस (रिकाम्या ट्रकसह) परवानगी राहील.
8.आरोग्य सेतूचा वापर
आरोग्य सेतू संसर्गाची संभाव्य जोखीम लवकर ओळखण्याचे कार्य सक्षमपणे करते आणि म्हणून ते व्यक्ती व समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करते.
कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चिता करण्याच्या दृष्टीकोनातून, नियोक्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करुन सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे सुसंगत मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप्लिकेशन स्थापित (इन्स्टॉल) केले असल्याबाबत खात्री करावी.
जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे सुसंगत मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप्लिकेशन स्थापित (इन्स्टॉल) करावे आणि त्यांचे आरोग्याची स्थिती नियमितपणे ॲपवर अद्यावत करावी. यामुळे जोखीम असलेल्या व्यक्तींना वेळेवर वैदयकीय सेवा देण्याची सोय होईल.
9.सर्वसामान्य सूचना
प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रा (CONTAINMENT ZONE) मध्ये यापूर्वी देण्यात आलेले आरोग्यविषयक सर्व आदेश व सूचना लागू राहतील.
10. दंडात्मक तरतूदी
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
या आदेशाची अंमलबजावणी दि. 1 जून, 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment