अजमेर येथिल हजरत खाँजा गरीब नवाज याच्या बदल अपशब्द करणाऱ्या देवगन यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुज्य नगरी न्यूज परंडा दि १७ जुन २०२७
सर्व धर्मीय भारतीयाचे श्रध्दा स्थान असलेले अजमेर येथिल जगप्रसिद्ध दर्गाह सुफी संत हजरत खाजा गरीब नवाज याच्या विषयी अपशब्द वापरुण अवमान केल्या बद्दल न्यूज 18 इंडिया चॕनलचे अॕकर अमिश देवगन याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुण अटक करण्यात यावी अशी मागणी पतंप्रधान नरेद्र मोदी याच्याकडे परंडा तहसिलदार अनिलकुमार हेळकर याच्या मार्फत परंडा शहरवासीया कडुन करण्यात आली .
दि १७ जुन रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अजमेर येथे हजरत खाँजा मैनुदीन चिश्ती (गरीब नवाज ) यांची जग प्रसिध्द दर्गाह असुन गरीब नवाज यांच्या दर्गाह चे दर्शन घेण्या साठी देश विदेशातुन मोठया प्रमाणात सर्व धर्मीय भक्त येतात , हजरत खॉजा साहेबांनी त्यांचे संपूर्ण जिवन गरीब दिन , दुबळ्याच्या हक्का साठी घालवीले व सत्याच्या मार्गावर चालुन जिवन जगन्यासाठी अवाहन केले त्यांच्या या महान कार्यामुळे प्राचीन काळात देखील गरीबांना न्याय मिळत असे या मुळेच त्यांना गरीब नवाज या टोपन नाव मिळाले .
मानसिक विकृत असलेला स्वताला पत्रकार म्हणुन घेणारा देवगण याने अश्या या महान सुफी संतावर अपशब्द वापरून समस्त हिंदू मुस्लीम भक्तांच्या भावणा दुखावल्या आहे अश्या विकृत लोकांना वेळीच रोखन्या साठी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदनावर पठाण समीर मतीण ,अझहर शेख ,जावेद पठाण नगरसेवक ,मुजाहिद मुजावर ,मुर्तुजा सय्यद ,मुस्तकीम कुरेशी ,रिजवान मुजावर ,रफिक सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .
Comments
Post a Comment