गेल्या अनेक महिन्या पासुन परंडा पोलिसांना गुंगारा देणारा गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक - उस्मानाबाद च्या स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
सा.पुज्य नगरी (ऑनलाईन न्यूज दि.२ जुन )
परंडा पोलिसांना हवा असलेला गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी बाबासाहेब गणपती गिलबिले, रा. परंडा हा गेल्या अनेक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता दिनांक १ जून रोजी उस्मानाबाद च्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आरोपीस अटक करून परंडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे .
आरोपी गिलबीले याच्यावर परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिष्टर क्र. 133/2020 भा.दं.वि. कलम- 307, 324, 34 नुसार गुन्हा दाखल आहे मात्र आरोपी फरार होता
सदरील आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. १ जुन रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी परंडा पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनिरिक्षक. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, विजय घुगे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने केली आहे.
Comments
Post a Comment