अरविंद बनसोडे मृत्यूची सीबीआय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी एन.डी.एम.जे संघटनेचे मुख्यमंत्र्यां कडे मागणी
पुज्य नगरी न्यूज (जवळा दि.२१ जुन )
नागपूर येथील अरविंद बनसोड या तरुण युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना तेथील स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करत नाहीत. हि घटना हत्या असताना आत्महत्या असल्याची नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शंका आहे. म्हणुन या घटनेचा तपास सीबीआय मार्फत करुन तपासात आढळुन येणाऱ्या संशयीत गुन्हेगारांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी एन.डी.एम.जे.संघटणेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी उस्मानाबाद मार्फत मुख्य मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या खुण प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे स्वरुप दिले आहे, हे प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे हा प्रकार निंदनीय व गंभीर आहे. तरी नागपुर येथील अरविंद बनसोड या तरूणांच्या हत्येची सीबीआय चौकशी करून या हत्येमागे चौकशीत आढळुन येणाऱ्या राजकीय, धनदांडगा कोणीही असेल अशा कोणत्याही गुन्हेगारास पाठीशी न घालता सर्व गुन्हेगारांवर कठोर शिक्षा व्हावी. आदी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटणेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी केली आहे .
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनावर अजिनाथ राऊत, नवजीवन चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment