महा ई-सेवा केंद्र सुरु करण्याची परवानगी मास्क, सनिटायझर व भौतिक अंतराचे पालन करुन लाभ घेण्याचे आवाहन
पुज्य नगरी उस्मानाबाद,दि.23 जुन
:-कोरोना विषाणूचा COVID-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना अंतर्गत सर्व तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तूर्त बंद ठेवण्यात आले होते.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या आदेशानुसार शहरासह तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.या व्यतिरिक्त सर्व ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्राद्वारे महसूल व इतर विभागाच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
तसेच नागरिक आपले सरकार पोर्टलद्वारे स्वत:लॉगीन करुन सुध्दा महसूल विभागासह इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या महा ई-सेवा केद्र,ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र किंवा आपले सरकार लॉगीन द्वारे सेवा उपलब्ध करुन घेण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहेत. या गॅस सेवांचा लाभ घेताना मास्क,सॅनिटायझर यांचा वापर करुन भौतिक अंतर ठेवण्यात यावेत.
Comments
Post a Comment