परंडा उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना बाधीत तीन रुग्णावर उपचार करून डिस्चार्ज = आरोग्य कर्मचाऱ्या कडून टाळ्या वाजऊन सुभेच्छा



पुज्य नगरी परंडा ( दि ३ जुन २०२० )

परंडा तालूक्यातील कुक्कड गाव येथिल कोरोना बाधीत ३ रुग्णावर परंडा येथिल उप जिल्हा रुग्णालयात उपचार करून दि ३ जुन रोजी डिस्चार्ज देण्यात आला . यावेळी डॉ अबरार पठाण व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना टाळया वाजऊन सुभेच्छा दिल्या व रुग्णांची घरी रवानगी करण्यात आली ,

परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे दि ११ मे रोजी  कोरोना बाधीत पहिला रूग्ण आढळला होता. त्या पाठोपाठ खंडेश्वरवाडी , कुक्कडगाव सह तालूक्यात एकुन १३  कोरोना बाधीत रूग्ण आढळुन आले होते त्या सर्व रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून  १३ पैकी ११ रुग्णावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले आहे .

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्या साठी जिल्हा व तालूका प्रशासणा कडून  विविध उपाय योजना करण्यात येत आसुन कोरोना बाधीत रुग्ण सापडलेल्या गावांना कोरोना विषाणुचा  संसर्ग रोखन्या साठी गावाला  सिल करण्यात आले होते .

 गेल्या दोन महिन्या पासुन सुरू असलेले लॉक डाऊन ३० जुन पर्यंत वाढविण्यात आले असून नियम अटी लाऊन व समाजिक अंतर राखुन दुकाने दररोज खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे .
 वयोवृद्ध व लहान मुलांनी शक्यतो घरा  बाहेर पडू नये असे अवाहन जिल्हाधिकारी यांनी केले  आहे .


Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न