बँक खात्यातील लाखो रुपयाची रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने काढून फसवणूक.” परंडा तालूक्यातील जवळा येथिल घटणा
पुज्य नगरी न्यूज (परंडा दि १७ जुन )
एका अनोळखी भामट्याने जवळा (नि.), ता. परंडा येथिल जाकीर हुसेन हुकमोद्दी मुल्ला यांच्या पे.टी.एम. खात्याद्वारे आय.सी.आय. बँक शाखा, परंडा येथील खात्यामधील १ लाख , ६२ हजार ९५७ रुपये व एस.बी.आय. बँक खात्यामधील ७४ हजार ९९९ रुपये अशी एकुण २ लाख ३७ हजार , ९५६ रुपये ऑनलाईन पध्दतीने दि १२ जुन रोजी परस्पर काढून फसवणुक केली आहे.
जाकीर हुसेन मुल्ला यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरुध्द दि. १६ जुन रोजी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment