परंडा तालूक्यातील रोहयो च्या बोगस कामाची चौकशीची मागणी


कामावर मजुर न लावता बोगस मस्टर काढण्याचे प्रयत्न 

सा . पुज्य नगरी ( दि ५ जुन )
परंडा तालूक्यातील खासगाव ग्रा .प मार्फत सुरू असलेले रोहयो अंतर्गत रस्ता कामावर मजुर न लावता यंत्रा द्वारे काम करण्यात येत असुन या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरीका मधुन होत आहे .

या बाबत आधिक माहिती की मजुरांच्या हाताला कामे मिळावे म्हणुन परंडा तालूक्यात अनेक ठिकाणच्या  रोहयो अंतर्गत रस्ता कामाला मंजुरी देण्यात आली आहे .
 परंडा तालुक्यातील खासगाव हद्दीतील सोनगीरी जिप शाळा ते रुई पालकी शेतरस्ता या अडीच किलो मिटर लांबीच्या २१ लाख रुपये किमतीच्या   रोहयो अंतर्गत रस्ता कामास मंजुरी देण्यात आली होती मात्र या कामावर मजुर न लावता रस्त्याचे काम यंत्राद्वारे करण्यात येत आहे.
ग्रामरोजगार सेवक यांने या कामावर  मजुर हजर नसताना देखील हजर असल्याचे दाखऊन बोगस मस्टर काढण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला जात आहे .
 खासगावच्या रस्ता कामावर ग्रामसेविका श्रीमती माने  यांनी दि .२ जुन रोजी भेट देऊन पाहणी केली त्या वेळी कामावर मजुर हजर नसल्याचे  त्रांतीक आधिकारी यांना कळविले मात्र त्यांनी दखल घेतल्याचे दिसत नाही अश्या बोगस कामाची सखोल चौकशी करावी व दोषी वर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ,

[ ] मजुर हजर नसलेल्या कामावरील मस्टर काढण्यात येणार नाही असे गटविकास अधिकारी यांनी  सांगितले [ ]

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न